मुंबई प्रतिनिधी | भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर महसूल आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली . ‘दादा, आपको महाराष्ट्र का प्रदेशाध्यक्ष बनाया है। पक्ष संघटन तो आप मजबूत करेंगे ऐसा मुझे विश्वास है; पर अपने देशकी संस्कृती बढाने के लिए आपको अध्यक्ष बनाया है। मुझे आशा है, ऐसा सुसंस्कृत कार्यकर्ता आप तयार करेंगे।’असे म्हणत मोदींनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचे ते म्हणाले . त्यामुळे मोदींनी आपल्यावर दाखविलेला विश्वास जपत आपण आपले कर्तव्य बजावणार असल्याचे पाटील म्हणाले .
आगामी विधानसभा निवडणुकी साठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात युतीच्या सर्व जागा निवडून आणू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला .
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कोल्हापुरात पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दसरा चौकात त्यांचे आगमन झाल्यावर ‘महाराष्ट्र का नेता कैसा हो चंद्रकांतदादा जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या. येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.