सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगले तापले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना भाजप महायुतीमध्ये थेट लढत होत आहे. यापार्श्वभुमीवर महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पाटील यांनी बाबाराजेंची गळाभेट घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तळात चर्चांना उधान आले आहे.
महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते थेट शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी गेली आणि त्यानी शिवेंद्रराजेंची गळाभेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवेंद्रराजे आणि नरेंन्द्र पाटील यांच्या गळाभेटीमुळे पाटील यांनी आपल्या विजयाची महुर्तमेढ रोवल्याचीच चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती.
यापूर्वी दोघांनी एकत्र खालेल्या मिसळ-पाव चर्चा जिल्ह्यात खूपच गाजली. त्याचप्रमाणे आज झालेल्या गळाभेटीची चर्चाही महत्वपूर्ण आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व नरेंद्र पाटील यांच्या मैत्री सर्वश्रृत आहेच परंतू निवडणुकांच्या तोंडावर झालेली ही गळाभेट जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप
शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले
पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा
स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या
उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात
साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद