हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अनेकांना फोन केले असा मोठा आरोप करत ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे समर्थक नरेश मस्के यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मस्के यांच्या या आरोपाने चर्चाना उधाण आलं आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनच्या निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा, म्हणून सर्वांना फोन करत होती. अजित पवार साहेब आधी आपलं घरातलं बघा, नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी तुम्ही कोणाकोणाला फोन केले आणि निरोप दिले ते आधी लोकांना सांगा आणि नंतर आमच्यावर टीका करा, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले. नरेश म्हस्के यांच्या या आरोपांना आता राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवार आणि रोहीत पवार नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागेल.
दरम्यान, 8 जानेवारी 2023 रोजी एमसीएची निवडणूक झाली होती. त्यात रोहित पवार अध्यक्ष म्हणून निवडून आले. या अगोदर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या 16 सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड करण्यात आली होती. याच एमसीए निवडणुकीवरून नरेश मस्के यांनी अजित पवारांवर आरोप केला आहे.