हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतेच खुले आव्हान दिले. त्याच्या आव्हानानंतर शिंदे गटाच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “आदित्य ठाकरेंची परिस्थिती शोले चित्रपटातील ‘जेलर’सारखी झाली आहे. त्यांना परळीतून निवडून आणण्यासाठी किती कष्ठ घ्यावे लागले, किती सेटलमेंट कराव्या लागल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, अशा शब्दांत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे.
ठाणे येथे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडून आणण्यासाठी किती सेटलमेंट कराव्या लागल्या आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. तेथील पदाधिकारी नाराज होऊ नये, म्हणून त्यांना मतदारसंघात महापौर करावे लागले. तुम्ही वरळी मतदारसंघच का निवडला? आपण जिथे राहता तेथून निवडणुकीसाठी उभे का राहिला नाहीत? कारण तुम्ही पडले असता हे आहे.
मी लायकी म्हणणार नाही, पण योग्यता आणि पात्रता नसलेल्या तरीही कॅबिनेट मंत्री झालेल्या व्यक्तीने आपली उंची आणि वय याचं भान ठेवलं पाहिजे. त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला शिवसेनेच्या कामात वाहून घेतलं आहे. त्यांच्यामागे शिवसनेनेला पाठिंबा देणारे ४० आणि सरकारला पाठिंबा देणारे १० आमदार आहेत. शिवाय १३ खासदार आणि लाखो शिवसैनिक आणि नगरसेवक त्यांच्या पाठिशी असल्याचे म्हस्के यांनी म्हंटले.