हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंतराळातील गोष्टींबाबत आपल्याला नेहमीच एक कुतूहल असते. या संपूर्ण ब्रह्मांडात फक्त पृथ्वीवरच जीवनावश्यक परिस्थिती आहे का? कि इतर कोणत्या ग्रहावरही माणूस राहू शकतो यावर जगभरातील शास्त्रज्ञ अभ्यास आणि संशोधन करत असतात. एलिअन्स हा शब्दही तुम्ही ऐकला असेल? जगात दुसऱ्या ग्रहावर एलिअन्स आहेत का? यावर सुद्धा अनेक अनेक मतमतांतरे आहेत. या सर्व पार्शवभूमीवर अमेरिकन अंतराळ एजन्सी नासा ऑक्टोबर महिन्यात एक नवीन मिशन सुरु करणार आहे. आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या अनेक चंद्रांपैकी एक असलेल्या युरोपाच्या दिशेने (NASA Mission Europa) NASA चे क्लिपर अंतराळयानप्रवास करणार आहे. युरोपावर जीवसृष्टी आहे का? याचा शोध घेण्यासाठी NASA हे खास मिशन लाँच करणार आहे.
शास्त्रज्ञांना वाटते की युरोपा बर्फाळ पाण्यात बुडलेले आहे. त्यांना आशा आहे की येथे जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी युरोपावर असू शकतात. याशिवाय नासाला एक मूलभूत प्रश्न समजून घ्यायचा आहे की आपण या विश्वात एकटे आहोत की आपल्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणीही जीवन आहे? जर आपल्याला जीवनासाठी अनुकूल परिस्थिती शोधायची असेल आणि एखाद्या दिवशी युरोपासारख्या ठिकाणी खरोखर जीवन शोधायचे असेल, तर असे म्हटले जाईल की पृथ्वी आणि युरोप ही आपल्या सूर्यमालेतील जीवनाची दोन उदाहरणे आहेत. असे मिशन प्रोजेक्ट शास्त्रज्ञ बॉब पापलार्डो यांनी एएफपीला सांगितले
युरोपाच्या कक्षेत पोहोचण्यासाठी 5 वर्षे लागणार – NASA Mission Europa
सध्या $5 अब्ज क्लिपर प्रोब कॅलिफोर्नियातील नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत (नासा जेपीएल) टेस्टिंग साठी ठेवण्यात आले आहे. फक्त ठराविक लोकांनाच त्याठिकाणी जाण्याची परवानगी आहे. एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटवर क्लिपर लाँच केले जाईल. गुरू ग्रह आणि युरोपाच्या कक्षेत पोहोचण्यासाठी (NASA Mission Europa) या अंतराळयानाला तब्बल 5 वर्षे लागतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्यानंतर हे अंतराळयान युरोपाचा अभ्यास सुरू करेल. नासाच्या म्हणण्यानुसार, हे क्लिपर अंतराळयान कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर, मॅग्नेटोमीटर आणि रडार यांसारख्या उपकरणांनी सुसज्ज आहे. त्यामुळे हे अंतराळयान आरामात बर्फात प्रवेश करून बर्फाचा थर किती जाड आहे किंवा पाणी द्रव स्वरूपात कोठे आहे हे सांगण्यास सक्षम असेल.