… तर मग ताजमहल आणि लाल किल्ला पाडा; नसीरुद्दीन शहांच वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “काही मोगल शासकांना जबरदस्तीने खलनायकाच्या रुपात दाखवलं जात आहे. मोगलांनीही चांगलं काम केलं आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना आक्रमक म्हणूनच दाखवलं जातं. मोगल जर एवढे क्रूर आणि विध्वंसक होते तर त्यांनी तयार केलेला ताज महाल आणि लाल किल्ला पाडून टाका, असे नसीरुद्दीन शहा यांनी म्हंटलं आहे.

नसीरुद्दीन शहा यांची ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड ही जी-5ची’ वेब सीरिज येत आहे. यात नसीरुद्दीन शहा सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब शोचा प्रीमियर पुढील महिन्यात होणार आहे. यानिमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी हे धक्कादायक विधान केले.

“काही लोक बोलतात मोगलांनी त्यांच्या परंपरांना ग्लोरीफाई केलं होतं. हे सत्यही असेल. पण याचा अर्थ त्यांना व्हिलन करता येणार नाही. त्यांनी जे काही केलं ते भयानकच असेल तर ताजमहल पाडून टाका. लाल किल्ला पाडून टाका. कुतुब मीनार पाडून टाका. आपण लाल किल्ल्याला पवित्र का मानतो? तो तर मोगलांनी बनवला आहे. त्यांचा उदोउदो करण्याची गरज नाही. पण त्यांना किमान व्हिलन तर बनवू नका. मोगल वाईट होते असा विचार करणं म्हणजे देशाच्या इतिहासाबाबतचं आपलं अज्ञान दर्शवतं. त्यांचं महिमामंडन आपल्या पुस्तकातून झालं नसेल. पण त्यांना विध्वसंक म्हणून नाकारणं योग्य नाही, असे शहा यांनी म्हंटले.