हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना शिंदे गटाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नाशिक मधील तब्बल 12 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे २-३ दिवसांपूर्वीच शिवसेना खासदादर नाशिकला गेले होते, मात्र राऊत मुंबईला परत जाताच नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत.
ठाकरे गटातील माजी नगरसेवक अजय बोरसे यांच्या सह रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, सुदाम ढेमसे, सुवर्णा मटाले, ज्योती खोले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुल, चंद्रकांत खाडे, प्रताप मेहरोलीया यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सचिन भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेले हे पक्षप्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का देणारे आहेत.
दरम्यान, २ दिवसांपूर्वीच संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नाराज पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या वन टू वन मुलाखती घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. नाशिकमधून कोणीही शिवसेना पदाधिकारी नगरसेवक फुटणार नाही असा दावा त्यांनी केला होता. मात्र त्यांची पाठ वळताच नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.