नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या (suicide) केली आहे. मालेगावातील नांदगावच्या बाणगाव बुद्रूक या ठिकाणी हि घटना घडली आहे. आपल्या राहत्या घरातच त्याने गळफास लावून आत्महत्या (suicide) केली आहे. जनार्दन कवडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज होते. ते दोन लाख रुपयांचं कर्ज कसे फेडायचे याच चिंतेतून त्याने आत्महत्या (suicide) केली आहे.
मागच्या महिन्यातदेखील कर्जबाजारीपणाला कंटाळून एका साठ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने बंगाली पिंपळा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना गेवराई तालुक्यातील सुशी या ठिकाणी घडली होती. उध्दव भगवानराव पौळ असे आत्महत्या (suicide) केलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
गेल्या 23 दिवसांत महाराष्ट्रामध्ये तब्बल 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या (suicide) केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून सर्वाधिक आत्महत्या या औरंगाबाद, बीड आणि यवतमाळमध्ये झाल्या आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?