नाशिक । कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबरच लोकांमध्ये या आजाराबद्दल भीतीही वाढत असल्याचं दिसत आहे. याच भीतीतून नाशिकमधील एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. असं नाशिक रोडमधील प्रतीक राजू कुमावत (वय वर्ष ३१) रा. श्रीकृष्ण कॉलनी, चेहेडी पंपिंग स्टेशन असं गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. कोरोना झाल्याच्या भीतीनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानं परिसरात एकच खळबळजनक उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, प्रतीक कुमावत हा प्लंबिंगचे काम करीत होता. गेल्या २-३ दिवसांपासून घसा दुखत असल्याने त्याला करोना संसर्गाच्या संशयाने घेरले होते. चेहेडी पंपिंग स्टेशन येथील एका खासगी डॉक्टरांकडे त्यानं उपचारही घेतले होते. परंतु, घरातील लोखंडी पाईपला साडी बांधून गळफास घेतला. शनिवारी सकाळी अचानक त्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
प्रतीकनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी मिळाली आहे. या चिठ्ठीत करोनाच्या आजाराच्या भीतीमुळं आत्महत्या केल्याचं या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मयत प्रतीक कुमावत याचा मृतदेह पालिकेच्या बिटको रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
या बातम्याही वाचा –
कोरोना आणि व्हायरस नावाची भानगड नक्की काय आहे ?@PawarSpeaks @rajeshtope11 @CMOMaharashtra @VarshaEGaikwad @RRPSpeaks @RohitPawarOffic #HelloMaharashtra #CoronaInMaharashtra #CoronaWarriors https://t.co/1nwSdQC4jA
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 9, 2020
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारुग्ण! जाणून घ्या कारण#coronavirus #HelloMaharashtrahttps://t.co/wlHA8EmcaI
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020