हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले, ”आपण घोर कलयुगामध्ये जगत असून, या कलियुगात कोरोना विषाणूविरूद्ध आपण लढू शकत नाही. १०० वर्षात एकदाच असा महारोग येतो.” न्यायमूर्ती पुढे म्हणाले,”करोना विषाणूशी दोन हाथ करताना केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील.”
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार देशात आतापर्यंत कोरोना विषाणूची १४८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तेलंगणात ताजे प्रकरण सापडले आहे. येथे यूकेमधून परत आलेल्या एका व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. भारतात करोनमुळं आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण संसर्गमुक्त झाले आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.