भाजपा कार्यकर्ते आणि पोलीसांत धुमश्चक्री, पोलीस अधिक्षक जखमी

0
47
Kolkata Police
Kolkata Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता | पश्चिम बंगाल येथील जलपाईगुडी जिल्ह्यामधे भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्यात हाणामारी झाली. यामधे एका अतिरिक्त पोलीस अधिक्षकासह १२ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सदरील धूपगुडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील धूपझोडा गावाजवळ घडली.

हाती आलेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्त्यांची एक बस राजकिय बैठकीसाठी कूचबिहारच्या दिशेने चालली होती. दरम्यान धूदझोडा येथे पोलीसांनी बस अडवली. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात शाब्दीक चकमक झाली. भाजप कार्यकर्त्यांनी बसमधून उतरुन पोलीसांना धक्काबुक्की केली. पोलीसांची संख्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत कमी असल्याने भाजप कार्यकर्ते वरचढ ठरले.

पोलीस अधिक्षक थेंदूप शेरपा यांस डोळ्यांना गंभीर जखम झाली असून उपचाराकरता त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीसांनी अतिरिक्त कुमक बोलावली. काही वेळातच परिस्थिती आवाक्यात आणण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले. अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असणार्या पोलीस अधिक्षक मैती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here