मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत १८२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत भाजपचे दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांचेही नाव या यादीत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा या यादीत समावेश आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून निवडणूक लढणार आहेत. मागच्या वेळी ते वाराणसी आणि बडोदा या दोन ठिकाणाहून निवडणूक लढले होते. मात्र यावेळी मोदी यंदाही दोन जागांवरुन लढतील का याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गुजरातमधील गांधीनगरमधून लढणार आहेत. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह उत्तर प्रदेशातील लखनौ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावरील भाजपचे मोठे नेते नितीन गडकरी हे त्यांच्या परंपरागत नागपूर या लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत. तसेच याच पहिल्या यादीत भाजपने महाराष्ट्रातील 16 उमेदवारांचीही घोषणा केली आहे.
इतर महत्वाचे –
शिवेंद्रराजेंना मीच निवडूण आणणार – उदयनराजे भोसले
मला फक्त समुद्राचीच लाट माहीत आहे – उदयनराजे भोसले
या कारणामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा जोरदार विरोध