नवी दिल्ली |सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून मोदींची वाह वा होत असताना मनमोहन सिंग यांनी देखील आपल्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा केला आहे. त्याच्या या दाव्याच्या काही वेळा नंतरच काँग्रेसने या संदर्भातील यादी जाहीर केली आहे. या यादीत सर्जिकल स्ट्राईक संदर्भातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
पहिला सर्जिकल स्ट्राईक हल्ला 19 जानेवारी 2008 रोजी, दुसरा 30 ऑगस्ट-1 सप्टेंबर, तिसरा 6 जानेवारी 2013, चौथा 27-28 जुलै 2013, पाचवा 6 ऑगस्ट 2013 आणि सहावा 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात आल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. आमच्या काळात देखील आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. मात्र भारतीय सेनेच्या त्या शौर्याचा वापर आम्ही कधीही मते मिळवण्यासाठी केला नाही असे विधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले आहे.
या आधी देखील राहुल गांधी यांच्याकडून आमच्या सरकारच्या काळात देखील सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आम्ही त्याचा वापर मतं मागण्यासाठी केला नाही असे राहुल गांधी देखील म्हणाले होते. आता काँग्रेसने आपल्या काळात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केल्याने भाजपची चांगलीच पंचायत होणार आहे.