नवी दिल्ली प्रतिनिधी | माजी क्रिकेटर गौतम गंभीर याने भाजप पक्षात प्रवेश केला आहे. गौतम गंभीर दिल्ली लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढणार असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीर यांनीं भाजप प्रवेश केला.
नवी दिल्लीत भाजपकडे लोकसभेसाठी सात जागा आहेत. दिल्लीतील भाजप खासदारांना विरोध होत असल्यामुळे भाजपने नवीन उमेदवारांना पुढे आणले आहे. म्हणूनच गौतम गंभीर सारख्या नव्या उमेदवारांना नवी दिल्ल्ली येथून लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळू शकते. तसेच गौतम गंभीरच्या क्रिकेट मधील कारकिर्दीचा भाजपला फायदा होऊ शकतो.
काही दिवसापासून गंभीर दिल्लीच्या राजकारणावर बोलत आहेत. तासाचे गंभीर यांनी केजरीवाल यांच्या कारकिर्दीला प्रश्न उपस्थित केले होते. तसेच केजरीवाल यांच्यावर ते सतत निशाणा साधत होते. तेव्हाच गंभीर राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा सुरु होती. या लोकसभा निवडणुकीतून आपल्या राजकीय कार्याला ते सुरवात करतील. मागील वर्षी त्यांनी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे.
इतर महत्वाचे –
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे जाहीर