गोव्यात काँग्रेसचा राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल निधन झाले. त्यामुळे गोव्याचे मुख्यमंत्री पद रिकामे झाले आहे. भाजपकडे असलेले हे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. मनोहर पर्रीकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तिथे आता पोटनिवडणूक घ्यावी लागेल.

गोव्यात भाजप युतीचं सरकार आहे. यामध्ये भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. गोवा विधानसभेच्या ४० जागांपैकी सध्या काँग्रेसकडे सर्वाधिक १४ जागा आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने गोव्याच्या राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. त्यामुळे गोव्यात राजकीय घडामोडींना वेग येऊ शकतो.

गोव्यात मार्च २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४० पैकी सर्वाधिक १७ जागा जिंकल्या. भाजपने या निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळवला. पण २ अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी ३ आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता.

 

इतर महत्वाचे –

अहमदनगरमध्ये राजकीय कुरघोडी, शंकरराव गडाख यांच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती  

कराड पोलीसांची धडाकेबाज कारवाई, बँकेवर दरोडा टाकणार्‍या त्या पाच जणांना तीनच दिवसात केले जेरबंद

भाजप खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका..

जळगावमध्ये अपघातांच्या साखळीत तिघेजण ठार…

Leave a Comment