..तर शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल- संजय राऊत

‘आमच्या पक्षाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना केलं. ‘या विधेयकासंबंधी आमच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर कारण्यासंदर्भांत समाधानकारक ऊत्तरे नाही मिळाल्यास आम्ही राज्यसभेत थेट लोकसभेत घेतलेल्या भूमिके विरुद्ध भूमिका घेऊ’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिले.

नागरिकत्व सुधारणा विधेयक: आसाममध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार

गुवाहाटी | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन ईशान्य भारत धुमसत आहे. बुधवारी आसाममध्ये निदर्शने होत असताना पोलिस आणि आंदोलकांतमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी सांगितले की परिस्थितीवर मात करण्यासाठी डिब्रूगडमधील पोलिसांनी आंदोलकांवर रबर गोळ्या झाडल्या आणि लाठीचार्जही केला. त्याच वेळी, गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांनी मुख्य जीएस मार्ग बंद केला, त्यानंतर सचिवालयाजवळ पोलिसांशी चकमकी झाल्याचे वृत्त आहे. Assam: Protest being held … Read more

पी.चिदंबरम वकील म्हणून सुप्रीम कोर्टात पुन्हा हजर;सिब्बल-मनुसिंघवी यांच्या विरोधात लढणार केस

आयएनएक्स मीडिया ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जमीन मिळाल्यानंतर पी. चिदंबरम आज सुप्रीम कोर्टात वकील म्हणून पुन्हा हजर होणार आहेत. १०६ दिवस तिहार तुरुंगात घालविल्यानंतर त्यांना जमीन मिळाला होता. त्यामुळं व्यवसायाने वकील असणाऱ्या पी. चिदंबरम यांनी पुन्हा वकील म्हणून सुप्रीम कोर्टात उभं राहणार आहेत. यासर्वांत गमतीशीर बाब म्हणजे ज्या कपिल सिब्बल आणि अभिषेक मनूसिंघवी यांनी चिदंबरम यांना जमीन मिळावा म्हणून जीवाचं रान केलं होत त्याच्याच विरोधात ते आज वकील म्हणून केस लढणार आहेत.

हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करू नका; राऊतांचा भाजपवर निशाणा

व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका.

गुजरात दंगली प्रकरणात नरेंद्र मोदी निर्दोष; नानावटी-मेहता आयोगाने दिली क्लीन चिट

गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर राज्यभर उसळलेल्या दगंली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चीट देण्यात आली आहे. गुजरात दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या नानावटी-मेहता आयोगाचा अहवाल गुजरात विधानसभेत सादर करण्यात आहे. या अहवालात तत्कालीन नरेंद्र मोदीं प्रणित सरकारला या प्रकरणात दोषी म्हणून आढळलं नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर झालेली दंगल पूर्वनियोजित नव्हती असं आयोगाने आपल्या अहवालात सांगितलं आहे.

पीएसएलव्ही चे आज पन्नासावा उड्डाण; भारतीयउपग्रहांसह इतर नऊ उपग्रहही अवकाशात

आजच्या प्रक्षेपणामधून ‘रिसॅट २ बीआर १’ या रडारसमाविष्ठ भारतीय उपग्रहाबरोबरच अमेरिका, जपान, इटली आणि इस्रायल या देशांच्या नऊ उपग्रहानंदेखील अवकाशात पाठवण्यात येणार आहे.

काश्मिरमध्ये ‘एसएमएस’ सेवा पुन्हा सुरू;  इंटरनेट मात्र बंदच

यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव येथील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सुरक्षेचा कारणास्तव बंद करण्यात आलेल्या विविध सेवांपैकी ‘एसएमएस’ सेवा मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; चर्चेसाठी सहा तासांचा अवधी

राज्यसभेत बहुमत नसले तरी हे विधेयक मंजूर होईल असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त होत आहे. तसेच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार असली तरी भाजपाला मात्र हे विधेयक राज्यसभेत पारित होईल अशी आशा आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन शिवसेनेने संधीसाधू राजकारण केलं आहे- ओवेसी

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने मतदान केल्यानं त्यांच्या भूमिकेवर आता एआयएमआयएमचे खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. शिवसेनेचे भांगडा राजकारण सुरु आहे असा शाब्दिक वार करत ओवेसी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.