देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री, राज्यात भाजप राष्ट्रवादीचं सरकार स्थापन

मुंबई | शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. Devendra Fadnavis to take oath as Maharashtra Chief Minister again,NCP's Ajit Pawar to take oath as Deputy CM … Read more

नेमबाजी विश्वचषक फायनल्स; मनु भाकरने सुवर्णपदक जिंकले

हॅलो महाराष्ट्र, प्रतिनिधी । भारताच्या मनु भाकरने पुटियान (चीन) येथे सुरु असलेल्या वर्ल्ड कप फायनल मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात आज सुवर्णपदक मिळवून इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट फेडरेशनच्या (आयएसएसएफ) प्रतिष्ठेच्या हंगामात १७ वर्षीय मनू भाकरने २४४. गुणांची नोंद केली. तिचा प्रतिस्पर्धी यशस्विनीसिंग देसवालने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे स्थान मिळविले. सर्बियाच्या … Read more

शरद पवारांना भाजपकडून खरोखर राष्ट्रपती पदाची आॅफर आहे का?

मुंबई | राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थापनेबाबत बैठकांवर बैठका घेत असताना भाजपने मास्टरस्ट्रोक ठोकला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपकडून राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं बोललं जात आहे. एनडीटीव्हीने पवारांना राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं वृत्त दिले आहे. शरद पवार आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. … Read more

न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

दिल्ली प्रतिनिधी । न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती बोबडे यांना मुख्य न्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या संक्षिप्त कार्यक्रमात त्यांनी ईश्वराच्या नावाने इंग्रजीमध्ये शपथ घेतली. न्यायमूर्ती बोबडे यांचा सरन्यायाधीश म्हणून एकूण १७ महिन्यांचा कालावधी असेल, ते २ एप्रिल २०२१ रोजी … Read more

प्रेमी युगुल मेट्रोत करत होते ‘असं’ काही, ते पाहून महिलेला अनावर झाला संताप

दिल्ली | देशाची राजधानी दिल्लीच्या मेट्रोमध्ये प्रवास करणार्‍या प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. अशाच एका प्रेमळ जोडप्याचा नवीन व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर घबराट पसरली आहे. परंतु प्रत्येक वेळीप्रमाणे हा व्हायरल व्हिडिओ लिप-लॉकचा नसून यावेळी एका जोडप्याच्या चाळ्यांमुळे एक … Read more

खूशखबर! ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना मिळणार पेन्शन, उपराज्यपालांची घोषणा

दिल्ली | जेष्ठ नागरिक, विधवा महिला आणि अपंगांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू यांनी शनिवारी केंद्रशासित प्रदेशातील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंग लोकांच्या पेन्शनच्या एक लाखाहून अधिक प्रकरणांना मंजुरी दिली आहे. केंद्रशासित प्रदेशातील प्रलंबित पेंशनच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी उपराज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाज कल्याण विभाग … Read more

राहुल गांधींवरून राजकारण पेटलं, देशाची माफी मागण्यावरून भाजप आक्रमक

राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी. अशी मागणी करत ठाण्यात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टात राफेल बाबत कोर्टानं निकाल दिल्यानंतर राहुल गांधींच्या चौकीदार चोर है याविधायावरून भाजपने पुन्हा एकदा राजकारण तापवलं आहे.

म्हणून देशभरात साजरा करतात राष्ट्रीय पत्रकार दिन । १६ नोव्हेंबर

दिनविशेष। राष्ट्रीय प्रेस दिन प्रत्येक वर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतात स्वतंत्र आणि जबाबदार प्रेसची उपस्थिती दर्शवितो. माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हंटले जाते. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीतही सत्य प्रकट करत असतो. ‘राष्ट्रीय प्रेस डे’ हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे आणि समाजाबद्दलच्या त्याच्या जबाबदाऱ्यांचे महत्व दर्शवितो . प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने … Read more

चौकीदार चोर है ! या विधानावर राहुल गांधींचा माफीनामा

आज सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अवमान प्रकरणात कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच न्यायालयाने राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यासह शबरीमाला मंदिराचा निकाल देणाऱ्या कोर्टाने तो एका मोठ्या खंडपीठाकडे सुपूर्द केला आहे.

रेल्वे ट्रॅकवर हाय होल्टेज ड्रामा ! ओव्हरहेड वायरमध्ये अडकलेला तरुण थोडक्यात बचावला

रेल्वे पोलिस जीआरपीच्या जवानांनी मंगळवारी डाब्रा रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर ओव्हरहेड वायरमधून एका युवकाची सुटका केल्याची घटना घडली. बचावकार्य सुरळीत पार पाडण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी या मार्गावर वीज बंद केली. त्यामुळं हा तरुण थोडक्यात बचावला आहे.