Breaking | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोणत्याच पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने आज अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी प्रथम सर्वात मोठा पक्ष म्हणुन भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरुन भाजपला पाठिंबा न दिल्याने भाजपला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले परंतू काँग्रेस … Read more

सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे. सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात, काँग्रेसचा ‘हा’ नेता मांडणार बाजू

मुंबई प्रतिनिधी | राज्यात सरकार स्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आला असून राज्यपालांनी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. मात्र आता शिवसेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना नेते अनिल परब यांच्या कडून सेनेने सदर याचिका दाखल केली आहे. राज्यपालांनी … Read more

राज्यात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट, राज्यपालांची राष्ट्रपतींना शिफारस?

विशेष प्रतिनिधी | राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू शकते अशी चर्चा सुरु आहे. राज्यपाल यांनी राष्ट्रपतींकडे आपला अहवाल पाठवला असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात शिफारस केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सोमवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. राज्यपालांनी राष्ट्रवादीला मंगळवार संध्याकाळी ८:३० … Read more

बंगालमध्ये ‘बुलबुल’ चक्रीवादळाचा तडाखा

दिल्ली प्रतिनिधी । बंगाल राज्यातील कोलकाता शहर, चोवीस परगणा व पूर्व मिदनापुर ह्या जिल्ह्यांना बुलबुल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. सुमारे ताशी १७० किलोमीटर वेगाने वाहणारे ह्या वाऱ्यांमुळे बंगाल परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे आतापर्यंत दहा बळी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यात आगामी येऊ घातलेली नियोजित यात्रा यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात … Read more

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी । आदर्श आचारसंहितेचे जनक व निवडणूक सुधारणांचा प्रारंभ करणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेलई नारायण अय्यर (टीएन) शेषन यांचे काल ह्रदयविकारामुळे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या दिड वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. टी एन सेशन यांच्याबद्दल – -टीएन शेषन हे 1955 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तामिळनाडू केडरचे अधिकारी होते. … Read more

अयोध्या निकालावर तापसी म्हणते, ‘हो गया. बस. अब?’

मुंबई प्रतिनिधी | आज अयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. निकालाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तापसी पन्नू हिने ट्विटरवर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Ho gaya. Bas. Ab ? — taapsee pannu (@taapsee) November 9, 2019 तापसीने … Read more

मी पुन्हा येईल म्हणणार्‍या फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. ‍‌१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज ८ नोव्हेंबर रोजी संपत असल्यामुळे फडणवीस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9 — ANI (@ANI) November … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट? अॅटर्नी जनरल व राज्यपालांच्या दरम्यान चर्चा

मुंबई प्रतिनिधी | राज्यात अद्याप कुठल्याही राजकीय पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मात्र भाजपने उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान विधानसभेचा … Read more

दिल्लीत आजपासून सम-विषम; नियमभंग केल्यास ४ हजार दंड

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या प्रदुषण पातळी मध्ये वाढ झाल्यामुळे संपूर्ण शहरात धुराचा एक थर हवेमध्ये तयार झाला आहे. त्यामुळे स्वच्छ असलेलं वातावरण आता धुरमय झाल्याने नागरिकांना श्वसनाचा व इतर त्रास होत आहे. यासाठी दिल्ली मध्ये पुन्हा ०४-०५ नोव्हेंबर पासून सम विषम योजनेवर कार धावतील. यातून दिल्ली सरकारने अपंग व्यक्ती, दुचाकी आणि आपत्कालीन … Read more