हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील काँग्रेस कशाला मोठा धक्का बसला आहे. महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना देव यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याबाबतचे पत्र पाठवले आहे. या पत्रात असल्याचे म्हंटले आहे.
काँग्रेस पक्षाच्यावतीने सध्या देशपातळीवर मोदी सरकारच्या विरोधात रणनीती आखण्याचे काम केले जात आहे. दुसरीकडे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे देखील काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचे सांगितले जात असताना आता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांचा राजीनामाच समोर आला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.
Former Cong MP Sushmita Dev resigns from party
Read @ANI Story | https://t.co/g6zlVT1yvr#Congress #SushmitaDev pic.twitter.com/rQo1PKWUzZ
— ANI Digital (@ani_digital) August 16, 2021
सुष्मिता देव यांचे राजीनामा देण्यापूर्वी पहिल्यांदा ट्विटर अकाऊंट काँग्रेसच्या अन्य नेत्यांसह ब्लॉक झाले होते. या ट्विटर बोलकसंदर्भात काँग्रेसकडून त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली होती. आता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.