मुंबई प्रतिनिधी। नवी मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसा आधी मंदा म्हात्रे यांनी आपला अर्ज भरला. यावेळी भाजपचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच गणेश नाईक व कुटुंबीय उपस्थिती होते.
राज्यात युती होणार याबाबतीत एकमत झालेलं असताना मंदा म्हात्रेंच्या निवडणूक अर्जाची पूर्तता करतेवेळी शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडला. नवी मुंबईतील मतदारसंघात शिवसेनेला जागा न दिल्याची नाराजगी शिवसैनिकांनी यावेळी दाखवून दिली.
राज्यात १५ ते २० मतदारसंघांमध्ये सेना आणि भाजप युतीमध्ये तणाव आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी अंतिम तारीख असल्याने ज्या त्या पक्षातील कार्यकर्ते आपल्या निष्ठावंत नेत्याला साथ देत, निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. निष्ठवंतांना अडचणीत आणून ऐनवेळी दुसरा उमेदवार दिल्याच्या नाराजीमुळे प्रादेशिक पक्षांच्या अडचणीही वाढत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.