राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक; मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेनं गुन्हा दाखल केल्यानंतर आता त्यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. भडखावू वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. राणा दाम्पत्त्यावर 153A हा कलम लावण्यात आला आहे.  यावेळी नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

आधी आम्हांला वॉरंट दाखवा तरच आम्ही येऊ अस म्हणत नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पोलिसांवरच आगपाखड केली. यावेळी संतापलेल्या नवनीत राणा यांनी पोलिसांवर हातवारे करत उलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी त्यांना आपल्या गाडीत बसवुन खार पोलीस स्टेशनला नेले. नवनीत राणा आणि रवी राणा यांची आजची रात्र तुरुंगातच जाणार असून उद्या त्यांना वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीस राणा दाम्पत्याच्या पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना त्यांच्या घराबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमले होते. यावेळी शिवसैनिकानी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील देण्यात आल्या. एकुणच या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा रंगला.