मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुमची वाट लागेल…; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

0
124
Navneet Rana Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल शिवसंपर्क अभियानाअंतर्गत जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यावर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर मुन्नाभाईचे उदाहरण देत निशाणा साधला होता. यावरून खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले असून मुन्नाभाई हा चित्रपट सुपरहिट झाला होता. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. जर हा मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुमची वाट लागेल, असा इशारा देत कालच्या सभा स्थळी जाऊन हनुमान चालिसा वाचून शुद्धीकरण करणार असल्याचे राणा यांनी म्हंटले.

नवनीत राणा व रवी राणा यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून त्याच्यावर निशाणा साधला. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल त्यावेळी त्यांना कळेल कि कोणताही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्याच्या दुःख काय असते. आणि वेळही लवकरच येणार आहे जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल.

उद्धव ठाकरे यांनी काल राज ठाकरे यांच्यावर टीका करताना मुन्नाभाईचे उदाहरण दिले. त्यावेळी कोणाबद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांना बाळासाहेब दिसतात. मुन्नाभाई सुपरहिट पिक्चर होता. जर ते हिट झाले तर तुम्ही सुपरफ्लॉप व्हाल. जे स्वप्न पाहतात, तेच ती पूर्ण करण्याची हिंमत ठेवतात, अशा शब्दात राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा

राणा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या कालच्या सभेवरून टीका केली. यावेळी राणा म्हणाल्या की, उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री कार्यालयात गेले नाहीत. मुख्यमंत्री विदर्भ, मराठवाड्यात गेल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. पण त्यांच्या दौऱ्याचा फक्त एकतरी व्हिडीओ त्यांनी जाहीर करावा. ते औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक शब्द बोलले नाहीत. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचे तुम्हीच म्हणाला होता. पण सभेत बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत. वास्तविक लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा होती,अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here