रवी राणा – बच्चू कडूंच्या वादावर नवनीत राणांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद काही केल्यासंपुष्टात येताना दिसत नाही. दोघांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी प्रयत्न केले. त्यांच्या मध्यस्थीने दोघांच्यातील वाद मिटला आहे. आता यावर रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रवी राणा आणि बच्चू कडू यांनी आप आपसातले वाद विसरून एकत्र यावं, असे नवनीत राणा यांनी म्हंटले आहे.

नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “घरी मी त्यांची पत्नी आहे, पण बाहेर मी केवळ एक लोकप्रतिनिधी, लोकसेवक आहे. दोघांच्यातील वाद पूर्णपणे मिटला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आदेश आमच्यासाठी सर्वस्व आहेत. म्हणून बैठकीनंतर लगेचच मी तो वाद मिटल्याचं जाहीर केलं,”

एकंदरीत रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे बच्चू कडू नाराज असून, राणांच्या वक्तव्यानंतर कडू फडणवीसांकडे नाराजी व्यक्त करणार असल्याची चर्चा होती. मात्र बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. राणांचं वक्तव्य साधारण आहे, मला वाद वाढवायचा नाही. मतदारसंघाला निधी दिल्यानं आभार माणण्यासाठी फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.