नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो

1
46
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दोघांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी या गावात जाऊन सोयाबीनची पेरणी केली. शेतातल्या मजुरांच्या साथीने रवी राणा आणि नवनीत राणा दोघांनी मिळून तीन काकरी तीसा चालवत पेरणी केली.

यावेळी खासदारांनी कमरेला ओटी बांधून सरत्यावर सोयाबीनच्या बियांची रास सोडली. तर ‘बैल हो’ असा आवाज देत आमदारांनी बैल जोडी चालवली. दोघेही आमदार खासदार पती-पत्नी मिळून पेरणी करत आहेत म्हंटल्यावर गावातल्या शेतकऱ्यांनी हे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.

यावेळी यंदा चांगला पाऊस पडू दे आणि बळीराजाची शेतीत चांगलं पीक येऊ दे अशी खासदार नवनीत राणा यांनी पांडुरंगाचरणी प्रार्थना केली.ज्या दमदार पावसाची वाट अमरावतीचा शेतकरी पाहत आहे तास दमदार पाऊस अजून बरसला नसला तरी पेरणीयोग्य जमीन झाल्यामुळे बळीराजा पेरणी सुरु केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

चहाला सुध्दा २० रुपये लागतात २०० रुपयात कशी गुजराण होणार : नवनीत राणा

नवनीत राणा भाजपच्या वाटेवर ; अमित शहांची घेतली भेट

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

शिवसेनेचा गड ढासळला ; अमरावतीत नवनीत राणा विजयी

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

 

1 COMMENT

  1. किती एकर केली… फक्त फोटो काढण्यापुर्ती पेरणी केल्याचे भासवता,मिडियाने यांची फुकटची वाहवाह करने चुकीचे आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here