हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात नवरात्रीचा उत्सव (Navratri 2023)मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास करतात. परंतु नवरात्रीचे उपवास करताना तुम्हाला तुमच्या शरीराची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उपवासाचे जसे तुमच्या शरीराला चांगले फायदे मिळतात तसेच उपवास करताना तुम्ही जर तुमच्या शरीराची व तुमच्या आहाराची काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते .
उपवास केल्यामुळे तुमचे शरीरातील अनेक विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात .त्यामुळे शरीरशुद्धी होते. व त्यामुळे तुमच्या किडनी व यकृताला फायदा मिळतो. हे जरी खरे असले तरी उपवासात योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. उपवासात कुठली काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया .
साखरेचे प्रमाण अधिक असलेले फळ खाणे टाळावेत:
उपवास करताना अधिक साखरेचे प्रमाणअसलेले फळ खाणे टाळले पाहिजेत. कारण या फळामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढते . यामुळे तुम्ही डायबेटीजचे रुग्ण असाल तर तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो .
योग्य प्रमाणात पाणी प्या :
उपवास करताना योग्य प्रमाणात पाणी प्यावे. उपवासा दरम्यान तुम्हाला बद्धकोष्टता, आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो . त्यामुळे उपवासात योग्य प्रमाणात पाणी प्यावे. तसेच पाण्याचे प्रमाण असलेले उपवासाचे पदार्थ आहारात ठेवावेत .
जास्तवेळ अधिक उन्हात फिरू नका :
उपवासाच्या वेळी जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे आणि उपवासा दरम्यान जास्त वेळ उन्हात जाणे टाळावे. यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होऊन शरीरांतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तब्येतीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो कामाव्यतिरिक्त उन्हात फिरणे टाळावे