तब्बल ३१ लाखांचे बक्षिस नावावर असणाऱ्या जहाल माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली प्रतिनिधी । रितेश वासनिक

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मअसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आल्यामुळं माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतच एकुण ३१ लाख ५० हजार रुपये बक्षीस असलेल्या एकुण सहा जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. माओवाद्यांनी ना. पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र मा. महादेव तांबडे, मा. पोलीस अधीक्षक गडविरोली श्री शैलेश बल्कवडे सा. यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यामध्ये १ पुरुष आणि पाच महिला माओवादयांचा समावेश आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक गडविरोली शैलेश बल्कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये संदीप उर्फ महारू चमरू वड्डे, मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनराव कुरचमामी, स्वरपा उर्फ संथिला उर्फ सरिता सुकलू आतला, अग्नी उर्फ निला मोतीराम तुलावी, ममिता उर्फ ममता जन्ना राजू पल्लो आणि तुलसी उर्फ मारे सन्नू कोटामी यांचा समावेश आहे.

गडचिरोली पोलीस दलाने सातत्यपुर्ण नक्षलविरोधी अभियान यशस्वीपणे राबविल्यामुळे त्यावबरोबर सार्वजनिक विधानसभा निवडणुक २०१९ आणि सार्वजनिक लोकसभा निवडणुक २०१९ मध्ये नक्षलवादावर वचक ठेवत कोठेही कोपताही अनुचित प्रकार घडू न देता केलेली यशस्वी कामगिरी यामुळे माओवाद्यांचे मनोबल ढासळण्यास मदत मिळाली. नागरी कृती शाखेमार्फत गडचिरोली पोलीसांनी जिल्हाभरात आदिवासी बांधवांकरीता घेतलेले जनजागरण मेळावे, शांती मेळावे, ग्रामभेटी तसेच नवजीवन योजने अंतर्गत जे तरुण तरुणी नक्षलमध्ये भरती झाले आहेत. त्यांच्या घरी पोलीसांनी जाऊन त्यांना सुखी जीवनाचे महत्व पटवुन सांगितल्याने व नक्षल नातेवाईकांसाठी दिलेली मदत व आयोजित केलेल्या सहली यामुळे त्यांच्या मनात पोलीस दलाबाबत निर्माण झालेला विश्वास याचा परिणाम म्हणुन संपुर्ण चातगाव दलमने नुकतेच आत्मसमर्पण केले होते.

त्यातच आता कसनसुर दलम कमांडरसह ०६ जहाल माओवादयांनी आता आत्मसमर्पण केले आहे. याबाबत गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक महादेव तांबडे यांनी अधिक माहिती दिली. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळं सन २०१९ मध्ये आजपर्यंत एकुण २९ माओवादयांनी आत्मसमर्पण केले असुन, यात ०३ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०१ दलम उपकमांडर, २२ सदस्य, ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. तर २१ माओवादयांना अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. यामध्ये डी. के. एस. झेड. सी. मेंबर ०२, दलग कगांडर ०१, सदस्य ०३, पार्टी में बर ०२, समर्थक १३ यांचा समावेश आहे. सन २००५ आजपर्यंत एकुप ६३३ माओवादयांगी आत्मसमर्पण केले आहे.

Leave a Comment