दहशतवाद सोडून तो सैन्यात आला आणि देशासाठी शहीद झाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शोपिया | काश्मीर म्हटलं की दहशतवाद आणि चकमकी हे समिकरण कायमचंच. आजवर काश्मिरमधील दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकींमधे हजारो जवानांनी आपल्या प्राण्यांची अाहुती दिली आहे. परंतु आज मात्र पुर्वी दहशतवादी असलेला आणि नंतर त्यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर भारतीय सैन्यात सामिल झालेला नाझीर देशसेवा करताना शहिद झाला.

३८ वर्षाचा नाझीर वाणी रविवारी शोपियांमध्ये पाठवण्यात आलेल्या सैन्याच्या तुकडीत होता. या तुकडीने ६ दहशतवाद्यांना ठार मारले. चकमकीत नाझीरला गोळ्या लागल्या. तो गंभीर जखमी झाला. त्याला लगेच शॉपियांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. सोमवारी नाझीरवर दक्षिण काश्मीरमधील त्याच्या गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, २१ तोफांची सलामी देण्यात आली.

नाझीर अहमद वाणी हा कुलगाम जिल्ह्यातील चेकी तालुक्यातील अश्मुजी गावचा निवासी होता. या परिसरात दहशतवाद भरपूर फोफावला आहे. नाझीर ऐन तारुण्यात दहशतवादी बनला पण त्याला दहशतवादाचा फोलपणा लक्षात आला. तो दहशतवाद्यांच्या गटातून बाहेर पडला. लष्करात भर्ती झाला. अनेक दहशतवाद विरोधी हल्ल्यांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २००७ मध्ये त्याला शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते.

Leave a Comment