हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अंमली पदार्थाच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे. यावर कारवाई करण्यासाठी एनसीबीच्या वतीने ठीक ठिकाणी छापे टाकत कारवाईही केली जात आहे. दरम्यान आज एनसीबीच्या पथकाच्या वतीने दिल्लीत शाहीन बाग आणि जामिया परिसरात कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये पथकाने तब्बल 350 कोटींचे 97 किलो ड्रग्ज तसेच 30 लाख रुपयाची रोकड जप्त केलेले आहे.
दिल्लीत आज दोन ठिकाणी एनसीबीच्या वतीने छापा टाकण्यात आला. या छापेमारीत येथील शाहीन बाग आणि जामिया परिसरातून पथकाने तब्बल 97 किलोचे ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत काही ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची माहिती एनसीबीच्या पथकास मिळालेली होती. माहिती मिळाल्यानंतर या पथकातील अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या छापेमारीत सुमारे 30 लाख रुपयांची रोकड व 350 कोटींचे ड्रग्ज सापडले. काल या प्रकरणी एका व्यक्तीलाही अटक केली होती. तर आज दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
#UPDATE | Two more arrested from Bhogal in connection with a case involving NCB Delhi zone which seized 50 kg high-quality heroin, 47 kg suspected narcotics, and other incriminating materials: NCB
Both are Afghan nationals.
— ANI (@ANI) April 29, 2022
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रक्कम व ड्रग्ज ताब्यात घेतले असून त्याच्याकडून या प्रकरणाची अधिकार चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणाशी कोणाचा संबंध आहे. जप्त केलेले ड्रग्ज कोठून आले? याचाही अधिक तपास करण्याचे काम सुरु आहे.
कालच्या कारवाईत 50 किलो हेरॉईन तर 47 किलो अंमली पदार्थ जप्त
दरम्यान, एनसीबीच्या दिल्ली येथील पथकाने काल शाहीन बागच्या जामिया नगरमध्ये मोठी कारवाई केली. यावेळी पथकास 50 किलो हेरॉईन आणि 47 किलो संशयित अंमली पदार्थ जप्त आढळून आले. यादरम्यान एका घरातून 30 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीनही सापडली आहे. काल या प्रकरणी एका व्यक्तीलाही अटक केली आहे. तर आज दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.