वारसा माणुसकीचा : रूग्णवाहिका नाही म्हणताच खासदार पुत्र थेट रूग्णालयात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील हे नेहमीच लोकांच्यात मिळून मिसळून काम करताना अनेकदा दिसत असतात. श्रीनिवास पाटील यांच्याप्रमाणे त्यांचे पुत्र सारंग श्रीनिवास पाटील हे पण आता वडिलांचा माणुसकीचा वारसा पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. सारंग पाटील वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून समाजकार्यात नेहमीच काम करताना दिसत असतात. गुरूवारी कराड- पाटण मार्गावर एका स्कॉर्पिओ आणि टेम्पोचा मोठा अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडीचा चालक गंभीर जखमी झाला होता, मात्र रूग्णवाहिका मिळत नसल्याने चक्क खासदार पुत्र हे स्वतः रूग्णाला घेवून कृष्णा रूग्णालयात पोहचले.

कराड- पाटण मार्गावर स्कॉर्पिओचा अपघातात चक्काचूर झाला. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. यावेळी या मार्गावर खासदार पुत्र सारंग पाटील हे प्रवास करत होते. त्यांनी अपघात पाहताच तात्काळ पाहणी केली. तसेच रूग्णवाहिका मिळविण्यासाठी रूग्णालयात फोनाफोनी केली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अशावेळी क्षणांचाही विलंब न करता, सारंग पाटील यांनी स्वतः च्या गाडीत जखमी अमित हिंदुराव शिंदे (वय- 34, रा. पाटण) यांना घेतले. अन् थेट कृष्णा रूग्णालय गाठले.

सारंग पाटील यांनी जखमीला गाडीत घेवून प्रवास करताना कृष्णा रूग्णालयात संपर्क साधत माहिती दिली. तसेच स्वतः रूग्णला उपचार सुरू होईपर्यंत तसेच नातेवाईकांना माहिती देण्याची जबाबदारीही पार पाडली. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पुत्राच्या या माणुकीमुळे अपघातातील जखमी तसेच उपस्थितांनी धन्यवाद दिले. कृष्णा रूग्णलायानेही तात्काळ या रूग्णावर उपचार सुरू केले.

Leave a Comment

हिना खानचे नवीन फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल. हिना खानची कातिलाना अदा पहाच …. . हिना खानचा हॉट अंदाज पहा ….. हिना खानचा गुलबी साडी मध्ये लेटेस्ट लूक. स्ट्रॉबेरी फळाचे आरोग्यवर्धक फायदे; पहा…