हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशा बद्दलची चर्चा सध्या जोर लावून धरत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशाही चर्चा रंगल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर अन्याय केला असा गंभीर आरोप ते वारंवार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय जीवनात अनेकांच्या भेटीगाठी होत असतात. त्यानुसार काही जण मला भेटून गेले. त्यामुळे भेट झाली म्हणजे काही काळंबेरं समजू नये. तसंच एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी तुम्हाला दिली आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात अजित पवारां हस्ते विधान भवन येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान भाजप नेत्यांनी मात्र खडसे कुठेही जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं. ते योग्य निर्णय घेतील, असा आम्हाला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया जळगावात बोलताना दिली होती. श्वास आहे”.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’