काही लोक काहीही बरळतात, त्यांना समाजात किंमत तरी आहे का ?? ; अजित पवार चंद्रकांत पाटलांवर कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे छोटे नेते असून त्यांचा अभ्यास नसतो अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. काही लोक काहीही बरळत आहेत. तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना समाजात काही किंमत आहे का?, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

काही लोकं काहीही बरळायला लागली आहेत. विशेष करुन विरोधी पक्षनेते खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत. त्यांना हे कितपत शोभतंय, त्यांना समाजात किती किंमत आहे? पवार साहेबांनी एखाद्या व्यक्तीला केंद्रीत करून राजकारण केलं नाही. त्यांनी नेहमी समाजासाठी काम केलं. विरोधी पक्षातील नेते स्वतःचा तोल गेल्यासारखं वक्तव्य करतायत. त्यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले. आपण कुणाबद्दल बोलतोय. काय बोलतोय, हे सुद्धा या लोकांना कळत नाही. त्यांची तेवढी ऊंची तरी आहे का?, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही. त्यांनी काय टीका करावी, ज्या पवार साहेबांनी समाज आणि राजकारणात 60 वर्ष काम केले आहे. महाराष्ट्राची जाण असणारे नेते आहेत. दिल्लीमध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे. ते सर्वांनी पाहिले आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सारख्याला पवार साहेबाबद्दलचे विधान शोभत नाही. त्यामुळे त्यांचे आजचे विधान म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी म्हणावी लागेल अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like