शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये ; अमोल कोल्हेंच चंद्रकांत पाटलांना सणसणीत प्रत्युत्तर

0
39
amol kolhe chandrakant dada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांना छोटे नेते म्हणलं होत. त्यावर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली आहे. शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी चंद्रकांतदादांवर हल्लाबोल केला आहे.

काल भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करायची नाही. पण शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये, अशी टीका करतानाच तुम्ही निखारा टाकला तर आम्ही वणवा पेटवू, असा इशारा कोल्हे यांनी दिला. देशात त्यांचा वरचष्मा आहे असं त्यांना वाटतंय. त्यामुळे त्यांना आता इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील-

शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका पाटील यांनी केली होती. राजकारणात येण्यापूर्वी पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here