हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांनी भाजपच्या 105 आमदारांना घरी बसवले. तेव्हाच बाप कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.
अमोल मेटकरी म्हणाले, काल भाजपाच्या एका महाशयाने, “आम्ही तुमचे बाप आहोत” असे वक्तव्य केले. त्यांच्या माहितीकरता 2019 चे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकासआघाडी सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 साली पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हे तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल. काळजी करू नका, असे मिटकरी यांनी म्हटले.
काय तर म्हणे, आम्ही तुमचे बाप आहोत. 2019 वि.स. निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून मविआ सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
2022 झाली पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहोत हे सिद्ध करून दाखवेल.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 11, 2020
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
काल पुणे येथे बोलताना भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता . पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हटले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’