हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्यानंतर पडळकरानी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पडळकरांवर पलटवार केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी भाजपलाच जबाबदार धरत हा भाजपनंच केलेला स्टंट आहे असा आरोप केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, जी घटना झाली ही कुठल्याही सदस्याच्या गाडीवर होऊ नये, मात्र, हा भारतीय जनता पक्षाकडून घडवून आणलेला स्टंट आहे. अशा प्रकारचा स्टंट घडवून आणायचा आणि स्वत: प्रकाश झोतात यायचं. मग सुरक्षेची मागणी करायची, अशी टीका अमोल मिटकरी यांनी पडळकरांवर केली.
पडळकर काय म्हणाले –
आज दगडं फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणं सोडणार नाही,’ अशी गर्जना गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचं हेच उत्तर आहे का? असा सवाल करत वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशाप्रकारे उत्तर देणार असतील तर मी कधी गप्प बसणार नाही असे पडळकर यांनी म्हंटल.