हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्याने अजित पवार आणि राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक आहे,’ असा सवाल करत अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती यावर आता राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. यावेळी टीका करताना त्यांचा चंपा असा उल्लेख केला आहे.
दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं, नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात,’ अशी जहरी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
दिल्लीतील चौकीदारचं लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओक च्या ड्राव्हरवर. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं,नंतर कोथरूड शोधावं लागलं. नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात.@TV9Marathi https://t.co/SHkl6fRhIr
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 6, 2021
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले
अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर केली हे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा सवाल पाटील यांनी अजित पवारांना केला होता.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.