मोदी समजून घेतील, पण चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच : राष्ट्रवादी

0
36
fadanvis chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

“चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

याशिवाय अमोल मिटकरींनी दुसरं ट्विट करुन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही घणाघात केला. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झाला आहे. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here