हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे विजयी उंबरठ्यावर असून राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भारतानाना भालके यांचे सुपूत्र भगीरथ भालके पराभवाच्या छायेत आहे. पंढरपूरच्या या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खेद व्यक्त करत भाजपला टोलेही लगावले.
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती.पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले. असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं.
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती.पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले. pic.twitter.com/TcMxkbSmQL
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 2, 2021
दरम्यान पंढरपूर पोटनिवडणुक राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्या अनुषंगाने जोरदार सभा देखील पंढरपूर मध्ये रंगल्या होत्या. दरम्यान तीन पक्ष एकत्र येऊनही भाजपचा झालेला विजय महाविकास आघाडी साठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.