हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्याच्या देहू नगरीत येणार आहेत. परंतु मोदींच्या दौऱ्यापूर्वीच एका बॅनर मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बॅनर वर पांडुरंगापेक्षा मोदींचा मोठा फोटो पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे.मोदी हे पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा अपमानआ हे अस त्यांनी म्हंटल आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, भाजपने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे आहे. यामागे भाजपची आध्यात्मिक आघाडी असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. भाजपाकडून सातत्याने अशा पद्धतीने समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचं पाप होत आहे असेही त्यांनी म्हंटल.
ते पुढे म्हणाले,नरेंद्र मोदी निश्चित मोठे आहेत, पण ते पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाही हा माझा वारकरी म्हणून विश्वास आहे. त्यामुळे हा तुकोबारायांचा, पांडुरंगाचा आणि वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. याबाबत भाजपने माफी मागावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली.