हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील कोरोना परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत दादांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटलांनी कुंभकर्णासारखं बरळु नये. आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं. अजितदादा किती तास झोपतात आणि जागतात हे संपुर्ण राज्याला माहिती आहे. उगाच उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटलांनी कुंभकर्णासारखे बरळु नये. आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुलन ढासळतं. अजितदादा किती तास झोपतात व जागतात हे संपुर्ण राज्याला माहिती आहे.उगाच उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका.@TV9Marathi@abpmajhatv@saamTVnews@zee24taasnews
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 21, 2021
नक्की काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील –
पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.