हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहेत. त्यामुळे सोलापुरात राष्ट्रवादीला भगदाड पडण्याची शक्यता आहे. राजन पाटील हे माजी आमदार तर बबनदादा शिंदे हे माढा मतदार संघाचे आमदार आहेत.
राजन पाटील आणि बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि खास करून शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज होते अशा चर्चा सुरु होत्या. आता त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने हे दोन्ही नेते भाजपात प्रवेश करणार का ? याकडे लक्ष्य लागलं आहे. असं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल.
तस पाहिल्यास बबनराव शिंदे यांचे माढा मतदार संघात तर राजन पाटील यांचे मोहोळ मतदार संघात राजकीय वजन आहे. माढा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. माढ्यातून आमदार बबन शिंदे हे तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत. तर दुसरीकडे आमदार राजन पाटील हे पक्षातीलच अंतर्गत कुरखोडीमुळे झाले आहेत. स्वतः राजन पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर घातली होती. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजन पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. त्याच्या दोन दिवसांनी राजन पाटील दिल्लीत गेले आहेत, त्यामुळे आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.