आत्ता फक्त खडसे आलेत, अजून अनेक आमदार आमच्या संपर्कात ; छगन भुजबळांचा दावा

chhagan bhujbal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता दिग्गज नेते छगन भुजबळ यांनीही उडी मारली आहे. आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते आणि भाजप सुद्धा त्यांना आपलं सरकार येणार अस चॉकलेट दाखवत होते. पण आता मात्र एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. आणि भाजपचे अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असून लवकरच ते भाजपची साथ सोडतील, असा दावा  छगन भुजबळ यांनी केला आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. भाजपने आता खडसेंची काळजी करु नये. खडसेंना काय मिळणार हे त्यांना आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित आहे. खडसेंनी 40 वर्ष भाजपची सेवा केली. त्यांना गेल्या चार पाच वर्षात भाजपने अपमानित केलं. आमच्याकडून तसे घडणार नाही असं भुजबळ म्हणाले.  एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार योग्य वेळी त्यांना न्याय देतील, असं सूचक वक्तव्य त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे. सरकारने 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केली असती तरी त्यावर विरोधकांनी टीका केली असती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवयाची आहे, असं भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे येणे असलेली रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना अजून मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’