शरद पवारांनी केलं एजाज पटेलचं कौतुक; ट्विट करत म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. सर्व जगभरातुन एजाज पटेल चे अभिनंदन होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पटेलच्या या विश्वविक्रमी कामगीरीची घेत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.

शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, कसोटीत एकाच डावात दहा बळी मिळवण्याची शानदार कामगिरी केल्याबद्दल एजाझ पटेलचे अभिनंदन. मुंबईत जन्मलेला आणि न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करत असताना अभिमानास्पद कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा क्रिकेटपटू.’ असे शरद पवार यांनी म्हंटल.

दरम्यान, एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटीत 47.5 षटके टाकली आणि 12 षटके निर्धाव टाकत 119 धावांत 10 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. १४१ वर्षांच्या कसोटी इतिहासात एका डावात १० बळी घेणारा एजाज पटेल हा जगातील फक्त तिसरा गोलंदाज आहे. कुंबळे आणि एजाजव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता