हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यशस्वी शस्त्रक्रियेनंतर ब्रीच कँडी रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
शरद पवार यांना 11 एप्रिल रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत
Update
Our party President Sharad Pawar saheb will be discharged from hospital today and is in good health.
Thank you everyone for your good wishes and support for Saheb.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 15, 2021
पोटदुखीच्या तक्रारीनंतर शरद पवार यांना मागील महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं त्यांच्यावर एन्डोस्कोपी करून त्यांच्या पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ११ एप्रिल रोजी पुन्हा त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस रुग्णालयातच विश्रांती घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page