हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज देशासमोर अनेक प्रश्न, समस्या असून लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न आपण सोडवायचे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. नेहरू सेंटर येथे शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आपण एका विचाराने महाराष्ट्रात आणि देशात काम करत असतो पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट्ये आहे. म्हणून आज जे असंख्य प्रश्न देशासमोर आहेत. सामान्य लोकांच्या समोर आहे. त्यांचे उत्तर शोधण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी काम करणारा पक्षातील कार्यकर्ता कोणता तर लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की, हा राष्ट्रवादी काँग्रेसचं असू शकतो त्या पद्धतीने पक्षाची बांधणी करायची आहे.
समाजातील उपेक्षित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. तो अधिकार त्यांना मिळायला हवा. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा असेही पवार यांनी आवाहन केले.