हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात जे काही सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत त्यामुळे आगामी काळात एक वेगळे चित्र राज्यात पहायला मिळेल असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं .
शरद पवार म्हणाले, आज राज्यात जी काही स्थिती आहे, यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाद दुसरा सोडला तर एकही आंदर निवडून येणार नाही, हे मला शिवसैनिक सांगत आहेत त्यामुळे आगामी काळात एक वेगळे चित्र राज्यात पाहायला मिळेल असेही पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवर हल्लबोल केला. भाजप सर्व यंत्रणा वापरुन राजकीय दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वांसाठी आज हा संघर्षाचा काळ आहे, मात्र भलेही सत्ता आज गेली असली तरी लोकांमध्ये जाऊन आपण त्यांचे प्रश्न सोडवून लोकांना न्याय मिळवून द्या, असा सल्ला शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला