चंद्रकांत पाटील यांनी खटला दाखल करून दाखवावा ; मुश्रीफांचे खुले आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यातील वैर जगजाहीर आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्या शंभर कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचे वक्तव्य केले. त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत त्यांनी वेळ दवडू नये, आजच दावा दाखल करावा, असे उघड आव्हान दिले आहे.

माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा काय देता, आजच विनाविलंब दावा दाखल करा,’ असे आव्हान ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले. केवळ राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपने माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई केल्याचा टोलाही त्यांनी मारला.

सीबीआय कारवाई ही भाजपचेच कटकारस्थान आहे असा दावा मुश्रीफ यांनी केला. ‘यात न्यायालयाची कसली आली बदनामी ? सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपनेच ही खेळी केली आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर बदनामीचा खटला दाखल करावाच. ज्यामुळे दूध का दूध अन् पाणी का पाणी होऊन जाईल असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment