Saturday, January 28, 2023

अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल ; हसन मुश्रीफांचा भाजपवर निशाणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अनिल देशमुखांवरील कारवाई ही सोची समझी चाल आहे असे हसन मुश्रीफ यांनी म्हंटल.

ही सोची समझी चाल आहे हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल तहसन मुश्रीफ यांनी केला. अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचं हे कारस्थान असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.

- Advertisement -

केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल आणि देशमुख या प्रकरणातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.