मुख्यमंत्र्यांना ए.सी.मध्ये बसून दुष्काळाच्या झळा कशा कळणार – जयंत पाटील

0
66
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयंत पाटलांचा बागणी गावातील ग्रामस्थांशी केली थेट चर्चा.

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले. मात्र आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ए.सी.मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बागणी येथे बोलताना केले.

विरोधकांनी कितीही चंग बांधला, तरी माझ्या मतदारसंघातील जनतेवर पूर्ण विश्र्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांनी बागणी गावात सुतारवाडा, मोमीनवाडा, आंबेडकरनगर, चांदोली वसाहत, नेमिष्टे गल्ली, पांढर मळा, पाटील वाडा आदी आठ ठिकाणी बैठका घेवून सामान्य माणसांशी थेट संपर्क केला.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, देशातील जनतेने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपला नव्हे तर विकासाच्या मुद्दयावर नरेंद्र मोदींना मतदान केले होते. मात्र गेल्या ५ वर्षात त्यांनी विकासकामे करण्यापेक्षा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत राज्य घटनेची प्रत जाळली मात्र मोदींनी त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. कोणी काय खावे? यावर ही बंधने लावण्यात आली. तुमचे एक मत या सामान्य माणूस व शेतकरी विरोधी सरकारला बदलू शकते. बागणी गावाच्या विकासात आपण सातत्याने भर घातली असून आपले ३० ते ३५ वर्षाचे ऋणानुबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here