सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही हा फडणवीसांचा दुटप्पीपणा; जयंत पाटलांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्हाला सत्तेत येण्याची गरज नाही तुम्ही फक्त मार्ग सांगा अस जयंत पाटील यांनी म्हंटल.

फडणवीस म्हणतात सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार. म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा तर फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. परंतु त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही सरकार चालवण्यास सक्षम आहोत. त्यांनी फक्त आम्हाला मार्ग सांगावा, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी फडणवीसांना दिलं आहे.

जयंत पाटील पुढे म्हणाले कि जर भाजपाला आणि फडणवीसांना ऐवढाच कळवळा असता तर छगन भूजबळांना एवढे वर्ष तुरुंगात खितपत ठेवले नसते. तसेच एकनाथ खडसे सारख्या नेत्याला त्रास देवून पक्ष सोडण्यास मजबूर केले. त्यामुळे आता ओबीसीसाठी आंदोलन करणे हे हास्यापद असल्याची टिका जयंत पाटील यांनी केली