…तर बंगलूरूवर देखील आमचा अधिकार; जयंत पाटलांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद सध्या चर्चेत आहे. त्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप देखील झाले आहेत. त्यातच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई हा कर्नाटकाचा भाग असल्याचं बेताल वक्तव्य केले होतं. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लक्ष्मण सावदी यांचा समाचार घेतला आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बंगलूरूवर आमचा जास्त हक्क आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी जो राज्यविस्तार केला तो अगदी दिल्लीपर्यत केला, जर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री मुंबई मागत असतील तर कर्नाटकची राजधानी बंगलूरूवर आपला अधिकार स्वाभाविक  आहे अस जयंत पाटील म्हणाले.

कर्नाटकचा संबध मुंबईशी कधी आला नाही, मात्र मराठी माणसाचा सबंध दिल्लीपर्यत आहे, मग आपला कर्नाटकावर जास्त हक्क आहे, तेव्हा अशा प्रकारचे वायफळ बोलू नये असा सल्ला जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमत्र्यांना दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like